आयपीएलची क्रांती; सेशनही होतं फिक्स

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, May 22, 2013 - 13:53

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल आणि आयपीएलनं क्रिकेट क्षेत्रात घडवून आणलेली ‘क्रांती’ आता भलतंच वळण घेताना दिसतेय. टेस्ट मॅचचं टी-२० मॅचमध्ये झालेलं रुपांतर प्रेक्षकांच्या पचनी पडलं. पण, फिक्सिंगच्या क्षेत्रातही आयपीएलनं ‘क्रांती’ घडवून आणल्याचं आता उघड झालंय.
होय... आत्ता-आत्तापर्यंत आपल्याला मॅच फिक्सिंग हा शब्द माहीत होता त्यानंतर आपल्याला श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंगही दाखवून दिलं आणि आता ‘सेशन फिक्सिंग’चाही इथं बोलबाला असल्याचं उघड झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार, ९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मोहालीला झालेल्या सामन्यात सेशनही फिक्स झालं होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या सहा षटकांसाठी बेटिंग करण्यात आली होती. या पॉवर प्लेमध्ये ४२ पेक्षा कमी धावा निघतील, अशी बेटिंग लावली गेली होती. या सहा षटकांत अजित चंदिला, एस. श्रीसंत आणि जेम्स फ्युकनर यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात चंदिलाने एक धाव देऊन एक विकेट घेतली. दुसर्याी षटकात श्रीसंतने फक्त पाच धावा दिल्या. तिसर्याा षटकात चंदिलाने फक्त पाच धावा दिल्या. चौथ्या षटकात श्रीसंतने शॉर्टपिच चेंडू टाकले आणि १४ धावा मोजल्या. यानंतर चंदिलाने पाचव्या षटकात चार धावा दिल्या. चंदिलाने खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्या पहिल्या स्पेलच्या तीन षटकांत १० धावा देताना एक विकेट घेतली. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात फ्युकनरने गोलंदाजी करताना दोन चौकारांसह नऊ धावा दिल्या. पहिल्या सहा षटकांत अशा प्रकारे एकूण ३७ धावा निघाल्या.

सेशन फिक्सिंग म्हणजे काय?
सेशन फिक्सिंगमध्येही सर्व काही आधीच ठरलेलं असतं. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोलंदाज सेशन फिक्सिंगमध्ये सामील असतात. सहा ते दहा षटकांचा खेळ सेशन फिक्सिंगमध्ये निश्चित होतो आणि निर्धारित षटकांत किती धावा निघतील, हेही ठरतं. यात कमीत कमी तीन ते चार गोलंदाज फिक्सिंगमध्ये सामील असतात. सट्ट्याचे भाव कमी किंवा जास्त झाले तर स्ट्रॅटेजिक टाइम आऊटच्या ब्रेकमध्ये ती माहिती खेळाडूंपर्यंत पोहोचवली जाते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013 - 13:53
comments powered by Disqus