निर्दोष सुटणार, श्रीशांतचा दावा

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या एस. श्रीशांतची तब्बल २७ दिवसांनंतर जामीनावर सुटका झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 12, 2013, 09:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या एस. श्रीशांतची तब्बल २७ दिवसांनंतर जामीनावर सुटका झालीय. आपल्यासाठी हा कठीण काळ असून जेलमधील ‘ते’ दिवस आपण कधीही विसरणार नसल्याची प्रतिक्रिया श्रीशांतने जेलमधून सुटका झाल्यावर दिलीय.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीसंतला अटक केली होती. संघटीत गुन्हेगारीचे पुरावे सादर करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने अखेर साकेत कोर्टाकडून श्रीशांत आणि अंकित चव्हाणसहित १९ जणांना जामीन मंजून झालाय. त्यांच्यावर लावला गेलेला ‘मोक्का’ही चुकीचा असल्याचं कोर्टानं यावेळी म्हटलंय.

जेलमध्ये तब्बल २७ दिवस व्यतीत केल्यानंतर मंगळवारी श्रीशांतची तुरुंगातून सुटका झालीय. यावेळी, ‘कायद्यावर माझा पूर्ण विश्वास असून मी निर्दोष सिद्ध होईन’ असा दावाही श्रीसंतनं जेलमधून सुटल्यानंतर केलाय. तपासात सहकार्य करणार असल्याचंही श्रीशांत म्हणतोय. `तुरुंगातील ते २७ दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. जेलमध्ये घालवलेला वेळ फारच कठीण होता` असं त्यानं बाहेर पडल्यानंतर म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.