स्पॉट फिक्सिंगः पुण्यातील बुकीला घेतले ताब्यात

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सुरूच असून मुंबई क्राईम ब्रांचने याप्रकरणी पुण्यातील एका मोठ्या बूकीला ताब्यात आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 3, 2013, 10:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सुरूच असून मुंबई क्राईम ब्रांचने याप्रकरणी पुण्यातील एका मोठ्या बूकीला ताब्यात आहे.
किशोर लालचंद बदलानी उर्फ केसू असे या बूकीचे नाव असून क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी त्याला इंटरनॅशनल एअरपोर्टवरून ताब्यात घेतले आहे. बदलानी हा पुण्यातील एक मोठा बूकी असून त्याचे पाकिस्तानमधील बूकींशी आणि डी गँगच्या लोकांशी संबंध असल्याचे समजते.
अटकेच्या भीतीने बदलानी युरोपला पळून जायच्या तयारीत असतानाचा क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी त्याला एअरपोर्टवरून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून बरीच महत्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.