झटपट रस मलाई

साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.

Updated: Aug 26, 2014, 01:55 PM IST
	झटपट रस मलाई title=

 साहित्य - १० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.

कृती - एका नॉनस्टीक पॅनमध्ये दूध घ्या आणि सतत ढवळत राहा. त्यानंतर दूधात साख, वेलची पूड आणि केसर टाका. गॅस बंद करा आणि दूध थंड होण्यासाठी ठेवून द्या.

त्यानंतर रसगुल्ले गोड पाण्यातू हलक्या हाताने पिळून घ्या आणि थंड झालेल्या दूधात ठेवा. गरज लागल्यास दूधात थोडीशी साखर घाला. तयार झालेल्या रसमलाईवर कापलेल्या काजू आणि बेदाण्यांनी सजावट करा आणि थंड रसमलाईचा आस्वाद घ्या.