अथर्वशीर्षचे बोबडे सूर घुमले...

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, September 27, 2012 - 20:27

www.24taas.com, सिंधुदुर्ग
गणेशोत्सवासाठी कोकणात वेगवेगळ्या कार्यक्रमांनी घर गजबजून गेली आहेत. सिंधुदुर्गात घरोघरी जावून शाळकरी मुलं गणेशाच्या मूर्तीसमोर अथर्वशीर्ष पठण करताना दिसत आहेत. भजन-आरत्याच्या मांगल्यमय वातावरणात घरोघरी येणारे अथर्वशीर्षचे सूर गणेशोत्सवाचा उत्साह वाढवत आहेत.
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच असतो. घरोघरी साजरा होणाऱ्या या उत्सवाचं अप्रूप साऱ्यांनाच असतं. या उत्सवात भजन, आरत्या, फुगड्या अशा पारंपरिक प्रकारांनी कोकणातील घर गजबजून जातात. यंदा मात्र सिंधुदुर्गातल्या मालवणात काहीसं वेगळंच चित्रं दिसतंय. भंडारी हायस्कूल मालवणचे विद्यार्थी यावर्षी घरोघरी जावून अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम राबवत आहेत. गणेशाचे आगमन आणि त्यात लहान मुलांच्या आवाजात अर्थवशीर्ष पठणानं घराचं मंदिर झाल्याचं चित्र पहायला मिळतंय.
कोकणाच्या वातावरणात असलेला गणेशनाद आणि त्याला मिळालेली अथर्वशीर्ष पठणाची जोड यामुळं साऱ्या परिसरात पारंपरिक गणेशोत्सवाची रंगत आणखीनच वाढलीय.

First Published: Thursday, September 27, 2012 - 20:27
comments powered by Disqus