अन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला...

Last Updated: Friday, September 21, 2012 - 19:42

www.24taas.com, नागपूर
नागपूरकर बाप्पाच्या सरबराईत कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. पण इथल्या उत्सवात कायमच एक उणीव भासलीये ती म्हणजे पारंपारिक ढोल-ताशांच्या पथकाची. पण अनेक वर्षांची नागपूरच्या उत्सवाची ही उणीव इथल्याच एका यंग ब्रिगेडनं भरून काढलीये.
२० ते ३० वयोगटातील या तरुणांनी `स्वराज गर्जना` नावाचं पथक स्थापन केलय. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये असं पथक आधीपासूनच होतं आता नागपूरही या यादीत जोडलं गेलय.
याच इच्छेने या यंग ब्रिगेडने हा खटाटोप केला. डीजे आणि नागपूरची खासियत असलेल्या संदल band बाजाला बाजूला सारत २५ सदस्यांच्या या समूहानं नागपुरात आपली दणदणीत उपस्थिती लावली.

First Published: Friday, September 21, 2012 - 19:42
comments powered by Disqus