राज्यात गणरायाच्या आगमनाची लगबग

गणपतीबाबप्पा मोरयाच्या गजरात गणपती बाप्पा घरोघरी पोहचू लागले आहेत. गणरायाच्या आगमनाची लगबग घरोघरी दिसतेय. पुजेची तायरीही सुरु आहे. यासाठी बाजारपेठाही फुल्ल झाल्यायेत. गणेश भक्तांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केलीये. गणेश भक्तांचा उत्साह अवर्णनिय असाच आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 19, 2012, 04:07 PM IST

www.24taas.com, मुंबई
गणपतीबाबप्पा मोरयाच्या गजरात गणपती बाप्पा घरोघरी पोहचू लागले आहेत. गणरायाच्या आगमनाची लगबग घरोघरी दिसतेय. पुजेची तायरीही सुरु आहे. यासाठी बाजारपेठाही फुल्ल झाल्यायेत. गणेश भक्तांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केलीये. गणेश भक्तांचा उत्साह अवर्णनिय असाच आहे.
पुण्यात झालेले बॉम्बस्फोट आणि आझाद मैदान हिंसाचारामुळे राज्यभर अलर्ट जाहीर करण्यात आलाय. गणेशोत्सवामध्ये पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आव्हान केलंय. बाप्पाचा हा सण र्निविघ्न पार पडावा यासाठी सर्वतोपरी काळजी घेताना दिसत आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात अनोखा उत्साह पाहायाल मिळतोय. कोकणात जाणा-या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कोकणासाठी एसटीने तब्बल १७०० जादा गाड्या सोडल्यात. मुंबई-गोवा महामार्गावर विशेष पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आलीये.
कोकणाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक, मंगलमय, आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणेशाचं आगमन..यंदाही अशाच भक्तीमय वातावरणात गणेशाचं आगमन झालंय. एरवी समुद्राशी नेहमीच सामना कऱणा-या कोळी बांधवांनी गणरायाला होडीमध्ये स्वार करत आपल्या घरी नेलंय.

समुद्र कितीही खवळलेला असला, आणि खाडीला कितीही भरती आलेली असली तरी आपल्या लाडक्या बाप्पाला जीवावर उदार होऊन कोळी बांधव समुद्राच्या लाटांशी खेळत घरी नेत असतात. यंदाही होडीतून बाप्पांना घरी नेण्यात आलं.

शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गणपती साजरा करण्याची प्रथा सुरू केली. ही परंपरा येथे आजही जपली जाते. किल्ल्यावर या मानाच्या गणपतीचं उत्साहात आगमन झालं.
मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरु झालीय. याचा गैरफायदा दहशतवादी घेऊ शकतात. हीच शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण मुंबईभर सुरक्षेचा चक्रव्यूह रचलाए. गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय.

गणेशोत्सवातील सुरक्षेसाठी मुंबईमध्ये १८ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेत. त्याचबरोबर
१ हजार अतिरिक्त जवान सज्ज राहणारेत. SRPF च्या ४ तुकड्या, RAF चे जवान, होमगार्डचे अडीच हजार तर सिव्हिल डिफेन्सचे ५०० जवान सज्ज राहणारेत. तसंच एटीएस आणि क्राईम ब्रांच संशयित हालचालींवर नजर ठेवणार असून गणेश मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेशही देण्यात आलेत.