गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात

By Aparna Deshpande | Last Updated: Sunday, September 8, 2013 - 09:33

www.24taas.com , झी मीडिया, रत्नागिरी
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आराम बसला सावर्डे-आगावे जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कोकणाकडे चाकरमानी जावू लागले आहेत. अशातच वसईहून आपल्या गावी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झालाय. अपघातामुळं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला असून एकेरी वाहतूक सुरू आहे.
चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं बस दोन-तीन वेळा उलटली आणि रस्त्यावरुन खाली पडली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींपैकी अनेकजण विरार भागातील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातामुळं विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 8, 2013 - 09:33
comments powered by Disqus