गणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, July 31, 2013 - 14:01

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली. गणेशोत्सवासाठी ४ ते २२ सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या १२० जादा फे-या यंदा धावणार आहे. ३१जुलैपासून जादा गाड्यांसाठीचं आरक्षण सुरू होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. हे आरक्षण केवळ दोन मिनिटांत फुल्ल झाले. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना पुन्हा गर्दीतून प्रवास करण्याची वेळ येणार आहे.
कोकणात जाण्यासाठी ६४ गाड्या कुर्ला टर्मिनसवरून, ४२ गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनसहून तर १६ गाड्या दादरहून धावणार आहेत. दादर-सावंतवाडीदरम्यान दररोज अनारक्षित ट्रेन जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची होणारी मोठी गर्दी पाहता एसटी महामंडळानं यंदा तब्बल १६६०जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. ४ ते९ सप्टेंबर या कालावधीत सुटणा-या या विशेष जादा गाड्यांपैकी मुंबई विभागातून १०६५ सोडण्यात येणार आहेत. तर उर्वरित ५९५ गाड्या इतर विभागातून सोडण्यात येतील.
एसटीच्या मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, नेहरुनगर, दादर, वाशी, ठाणे, पनवेल, बोरिवली,सायन याठिकाणांहून आरक्षण करता येणार आहे. खासगी केंद्रांवरही आरक्षणाची सुविधा देण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013 - 13:55
comments powered by Disqus