गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार, राजेश कदमांना अटक

गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार करणारे बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम यांना अटक करण्यात आली. सचिन देसाई आणि प्रताप कनोडिया या दोघा कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2013, 09:12 AM IST

ww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार करणारे बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम यांना अटक करण्यात आली. सचिन देसाई आणि प्रताप कनोडिया या दोघा कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील वीर संभाजीनगर संघ मित्र मंडळ गणेश विसर्जनसाठी मुलुंड पूर्वेकडील मोरया तलावाजवळ आले असताना पूर्वेकडील बाल मित्र मंडळाने या मंडळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही मंडळाच्या गाड्या एकमेकांना घासून गेल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं.
याच दरम्यान बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम याने अचानक आपल्या रिव्हॉल्वर जमावासमोर रोखून हवेत तीन राउंड झाडले. त्यामुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले होते. तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.