लाडू विकत घ्या, नशीब आजमवा...

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, September 18, 2013 - 13:26

www.24taas.com , झी मीडिया, हैदराबाद
हैदराबादच्या बाळापूरमध्ये सर्वात महागड्या लाडवाचा लिलाव झालाय. या लाडवाची किंमत आहे ९ लाख २६ हजार रुपये... आश्चर्य वाटून घेऊ नका... हा अनमोल लाडू एका कुटुंबानं विकत घेतला बाप्पाला त्याचा नैवेद्यही दाखवला.
हैदराबादच्या टीकेआर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं हा लाडू विकत घेतला. हा लाडू विकत घेतल्यानं नशीब फळफळतं अशी मान्यता आहे. दरवर्षीच बाळापूर इथं हा लाडू खरेदी करण्यासाठी भाविकांची रीघ लागते म्हणूनच हा लिलाव करण्यात येतो.
पौराणिक मान्यतेनुसार शुभ असणारा हा लाडू विकत घेतल्यानं आपलं नशीब आजमवण्यासाठी यंदा तब्बल साडेनऊ लाख रुपये खर्चून टीकेआर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं या लाडवाची खरेदी केली. मागील अनेक वर्षांपासून बाळापूर इथं ही परंपरा सुरू आहे. इथं लाडवाची बोली लावण्यात येते, जो सगळ्यात जास्त किंमत देईल लाडू त्याचा होतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 18, 2013 - 13:22
comments powered by Disqus