सलमानच्या गणपती विसर्जनाला कतरिनाची हजेरी!

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, September 11, 2013 - 20:27

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या ११ वर्षांपासून सलमान खानचे वडील सलीम खान आपल्या घरी गणपतीची स्थापना करत आहेत. या उत्सवात सलमानच्या घरी जवळपास सर्वच मोठमोठे कलाकार हजेरी लावतात.
दरवर्षी आपल्या वांद्र्याच्या घरात गणपती स्थापन करणाऱ्या खान कुटुंबाला यावेळी अल्विरा खानच्या सासरी गणपती स्थापन करावा लागला. वांद्र्यातील घराचं नव्याने बांधकाम सुरू असल्यामुळे कलमान खानकडील गणपती यावेळी त्याच्या बहिणीकडे स्थापन झाला आणि येथूनच मंगळवारी गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नेण्यात आलं. यावेळी सलमान खानसोबत असणाऱ्या पाहुण्यांमध्ये दोन पाहुण्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या त्या म्हणजे सलमान खानच्या कधी काळच्या गर्लफ्रेंड असणाऱ्या संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांनी...
पती मोहम्मद अझरुद्दीनशी काडीमोड केल्यानंतर संगीता बिजलानी खान कुटुंबाच्या सर्वच कार्यक्रमाला उपस्थित राहाताना दिसून येत आहे. मात्र कतरिना कैफ बऱ्याच दिवसांनी खान कुटुंबासोबत दिसून आली. रणबीर कपूरसोबत तिच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येऊ लागल्यानंतर कतरिना कैफ खान कुटुंबापासून दूरच होती. मात्र यावर्षी गणपती विसर्जनाला हजर राहून तिने उत्सवापुरता तरी आपल्यातील दुरावा मिटवला असल्याचं दिसून आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 11, 2013 - 20:27
comments powered by Disqus