मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी , Mumbai - Goa Highway traffic

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गणेश उत्सवाच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे या मार्गावर जड वाहने चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

कोकणात साज-या होणा-या पारंपरिक गणेशोत्सवासाठी मुंबईसह अनेक भागांतून चाकरमनी कोकणात जातात. परंतु गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणा-या मुंबई -गोवा हायवेवर वाहतूक कोंडीमुळे अनेक गणेशभक्तांना तासनतास होणा-या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे यंदा मुंबई - गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झालेत.

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातून जाणा-या पनवेल ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्वाच्या 16 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. पेण, वडखळ, वाकण, कोलाड, माणगाव, नातेखिंड, पोलादपूर अशा अनेक महत्वाच्या १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणारेत. तसंच ५ सप्टेंबरपासून १९ सप्टेंबरपर्यंत मुंबई -गोवा हायवेवरून अवजड वाहनांना ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली आहे.

अवजड वाहनांना कधी बंदी घालण्यात आली आहे. 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान पूर्णवेळ बंदी तर 10 सप्टेंबर ते 19सप्टेंबर - सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत बंदी. 13सप्टेंबर सकाळी 8 पासून ते 14 सप्टेंबरच्या रात्री 8 पर्यंत बंदी असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments
Post Comments