पंतप्रधान मोदींच्या चाबकाचा पहिला फटका खासदार प्रियंका रावतना

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप कडक आणि शिस्तीचे आहेत हे तर सर्वांनाच आता माहिती झालंय. याचा प्रत्यय त्यांच्या खासदारांनाही येतोय. बाराबंकी इशल्या नव्यानं निवडून आलेल्या खासदार प्रियंका सिंह रावत यांनी वडिलांनाच आपलं खासदार प्रतिनिधी बनवल्यामुळं मोदी चांगलेच तापले.

Aparna Deshpande | Updated: Jun 1, 2014, 04:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप कडक आणि शिस्तीचे आहेत हे तर सर्वांनाच आता माहिती झालंय. याचा प्रत्यय त्यांच्या खासदारांनाही येतोय. बाराबंकी इशल्या नव्यानं निवडून आलेल्या खासदार प्रियंका सिंह रावत यांनी वडिलांनाच आपलं खासदार प्रतिनिधी बनवल्यामुळं मोदी चांगलेच तापले. त्यांनी फोनकरून खासदार रावत यांना चांगलंच सुनावलं आणि वडिलांना प्रतिनिधी पदावरून हटवायला सांगितलं.
नरेंद्र मोदींनी प्रियंकाला रागावून म्हटलं की, त्यांनी आपल्य वडिलांच्या जागी पक्षातील दुसऱ्या कार्यकर्त्याला आपला प्रतिनिधी बनवावं.
आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पीए, पीएस किंवा प्रतिनिधी नेमायचं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व मंत्र्यांना आणि खासदारांना सुरूवातीलाच बजावलं होतं. खासदार प्रियंका रावत यांचे वडील उत्तम राम रिटार्यड पीडीएस अधिकारी आहेत. तेच रावत यांच्या जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि विकास कार्य़ सांभाळणार होते.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतर आता खासदार प्रियंका रावत यांनी वडील उत्तम राम यांना खासदार प्रतिनिधी पदावरून हटवलंय. एकूणच काय मोदींच्या शाळेतला पहिला चाबूक खासदार प्रियंका रावत यांना पडला असंच म्हणावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.