स्मृति इराणींनंतर आता काँग्रेसचा मोर्चा गोपीनाथ मुंडेंकडे

शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसनं आता आपला मोर्चा भाजपचे दुसरे मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 1, 2014, 01:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसनं आता आपला मोर्चा भाजपचे दुसरे मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवला आहे. ग्रामीण विकासमंत्री असणारे गोपीनाथ मुंडे यांनी १९७६ साली पदवीधर झाल्याचं नमूद केलं आहे. मात्र ते ज्या महाविद्यालयात शिकले त्याची स्थापना १९७८ साली झाल्याबाबत काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
सामाजिक संकेतस्थळांवर भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्याकडील खात्याबाबत मोठय़ा प्रमाणात चर्चा होताना दिसते. मुंडे यांनी १९७६ साली पदवी घेतल्याचं नमूद केलं आहे. मात्र ते शिकत असलेल्या महाविद्यालयाची स्थापनाच १९७८ साली झाल्याबाबत काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला आहे. यासाठी अहमद यांनी मुंडे यांच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा दाखल दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसनं आता भाजपच्या मंत्र्यांवर शिक्षणाच्या मुद्दय़ावरून टीकास्त्र सुरू केलंय. सुरुवातीलाच मनुष्यबळ विकासमंत्री असणऱ्या स्मृती इराणी पदवीधर नसल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस अजय माखन यांनी टीकेची झोड उडवली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.