अमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका

आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 6, 2014, 07:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमेठी
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
मोदींनी अमेठीत माझ्या शहीद वडिलांचा अपमान केलाय. अमेठीची जनता त्यांना माफ करणार नाही. याचं प्रत्युत्तर माझे बुथ कार्यकर्तेच देतील. प्रत्येक बुथवरून याचं उत्तर जाईल असं आव्हान प्रियांकांनी मोदींना दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.