ऑडिट मतदारसंघाचं : बीड

ऑडिट मतदारसंघाचं - बीड

Updated: Apr 4, 2014, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीड
मागासलेल्या मराठवाड्यातील अतिमागास म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा राज्यात परिचित आहे तो ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून. परराज्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांना तब्बल 5 ते साडे पाच लाख ऊस तोड मजूर पुरवणारा हा जिल्हा... बारा ज्योतिर्लिंगापैकी एक परळीचे वैजनाथ, कोकणवासीयांची कुलदैवत असणारी अंबाजोगाईची योगेश्वरी देवी, स्व. शंकरराव चव्हाणांची आठवण करून देणारे माजलगावचे धरण आणि महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे परळीचे औष्णिक वीज केंद्र याच बीड लोकसभा मतदारसंघात आहेत.
 
मराठी आद्यकवी मुकुंदराज यांनी मराठी सरस्वतीची पद्यमय रचना इथंच केली. त्यांचे समाधी स्थान अंबाजोगाईपासून 3 किमी अंतरावर आहे. गणितातील शून्य या संकल्पनेचे जनक भास्कराचार्य यांचा 12व्या शतकात बीड जिल्ह्यात जन्म झाल्याची नोंदही इतिहासात आढळते. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिकं घेतली जातात. बीड लोकसभा मतदारसंघातील बीड, आष्टी, गेवराई आणि माजलगाव या विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. तर परळी विधानसभा मतदारसंघात वंजारी मतदारांचं प्राबल्य पाहायला मिळतं. केज मतदारसंघ हा राखीव म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 
बीड लोकसभा मतदारसंघ हा 1996 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 1991मध्ये काँग्रेसच्या केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र त्यानंतर 1996साली गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं.
भाजपच्या पहिल्या खासदार म्हणून रजनी पाटील यांची 1996मध्ये निवड झाली. त्यानंतर 1998 आणि 1999मध्ये जयसिंगराव गायकवाड पाटील हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2004मध्ये जयसिंगरावांनी भाजपला रामराम ठोकून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवत पुन्हा खासदारकी मिळवली. 2009मध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे बीडचे नवे खासदार म्हणून निवडून आले.
 
2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 16 लाख 30 हजार 933 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 8 लाख 49 हजार 750 होती, तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 81 हजार 183 एवढी होती.
1996 नंतर जिल्ह्यातून ओहोटीला लागलेल्या काँग्रेसला पुन्हा कधीच भरती आली नाही. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघावर 40 वर्षे काँग्रेसची सत्ता राहिली. या मतदारसंघाने कम्युनिस्ट पक्षालाही दोन वेळा खासदारकीची संधी दिली आहे.
मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदार राष्ट्रवादीचे असतानाही भाजपचं कमळ फुलवण्याची किमया गोपीनाथ मुंडे यांनी 2009 मध्ये साधली. त्याच यशाची पुनरावृत्ती मुंडे करणार की राष्ट्रवादीचं घड्याळ वेगात फिरणार याचीच उत्सुकता सध्या बीडमध्ये आहे.
गोपीनाथ मुंडे यांची ओळख
नाव - खा. गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
जन्म - 12 डिसेंबर 1949
वय -  64 वर्षे
शिक्षण - पदवीधर
गोपीनाथ मुंडे म्हणजे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते... त्यांच्या घरामध्ये कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता... संघर्ष करत करत ते पुढे आले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, लोकसभा खासदार बनले... तथाकथित उच्चवर्गीयांपुरतं मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचं काम मुंडे यांनी केलं. 
12 डिसेंबर 2010 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता असा केला होता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे 2009 पासून लोकसभेत बीड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते लोकसभेतील उपनेते आहेत.
14 मार्च 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदही भुषवले. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली. ओबीसी नेतृत्व, सभेला गर्दी खेचणारे वक्ते व भक्कम जनाधार असलेले नेते ही महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडेंची ओळख.
 
2009 च्या निवडणुकीत बीडमध्ये तत्कालिन भाजप आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश अडासकर यांचा पराभव केला. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी कन्या पंकजा पालवे यांनीही हिरीरीने भाग घेतला.
2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना 5 लाख 53 हजार 994 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी म्हणून उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश अडासकर यांच्या पारड्यात 4 लाख 13 हजार 42 मते पडली. तब्बल 1 लाख 40 हजार 952 मतां