ऑडिट मतदारसंघाचं : लातूर

ऑडिट मतदारसंघाचं : लातूर

Updated: Apr 4, 2014, 04:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लातूर
काँग्रेसचा महाराष्ट्रातील अभेद्य गड असणारा हा मतदारसंघ. एखाद दुसरा अवपाद वगळता या मतदारसंघाने कधीही काँग्रेसचा हात सोडला नाही. या मतदारसंघाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले, इथल्या खासदारांनी केंद्रात वर्षानुवर्षे मंत्रीपदं उपभोगली.. काँग्रेसच्या एका नेत्याच्या करिष्म्याने या मतदारसंघाचे नाव देशात गाजले.. अगदी या नेत्याच्या नावानंच मतदारसंघाला ओळखही मिळाली.. पाहूयात कुठला आहे हा मतदारसंघ..
निवडणूक कोणतीही असो, रंगात आलेल्या भाषणात दोन शव्दांच्या मध्ये मोठ्ठा पॉझ ठेवून सगळं राजकारण नजरेतून सांगणारा अवलिया राजकारणी अशी विलासरावांची ओळख... आणि हेच  लातूरचं वैशिष्ट्य.. केवळ विलासरावच नव्हे, तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या रूपाने लातूरने महाराष्ट्राला आणखी एक मुख्यमंत्री दिला..तर देशांचे माजी गृहमंत्री आणि लोकसभेतही या मतदारसंघानं दिलेत....राजकिय क्षेत्र सोडलं तर लातूर म्हटलं की आठवतो तो शिक्षण क्षेत्रातला लातूर पॅटर्न... गोलाई आणि सिद्धेश्वराचे मंदिर... भूकंपानंतर सावरलेलं गाव.... आणि लातूरची डाळ.
 
लातूर मतदारसंघावर नेहमीच मामुली म्हणजे मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचा प्रभाव राहिला आहे.. त्यामुळे या समाजाची नाळ ओळखल्याशिवाय या मतदारसंघात कुणीही जिंकू शकत नाही... निवडणूकीच्या काळात लातूरमध्ये लिंगायत समाजात एक संदेश फिरतो, त्याला तम तम मंदी असं म्हणतात. म्हणजे आपआपली माणसं जपा. कानडीतून दिला जाणारा हा संदेश इतरांना कळत नाही.
लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 9 हजार 987 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या 7 लाख 92 हजार 711 तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 17 हजार 276 इतकी आहे. त्यापैकी 60 टक्के मतदार शहरी भागातील, तर 40 टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून लातूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्लाच समजला जातो.  1977 मध्ये शेकापचे उद्धवराव पाटील निवडून आले होते. त्यानंतर 1980, 84, 89,91,96,98,99 अशी सलग सात टर्म शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसचा हा गड समर्थपणे जोपासला. मात्र  2004मध्ये काँग्रेसच्या या गडाला भाजपने हादरा दिला. त्यामध्ये विलासरावांचेही राजकारण असल्याची भावना लोकांमध्ये होती.
राज्याचे माजी मुंख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची सून रुपाताई पाटील निलंगेकर यांनी भाजपकडून लढताना शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला. २००९ मध्ये लातूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि विलासरावांनी थेट कोल्हापूरहून जयवंतराव आवळे यांच्या रूपाने उमेदवार आयात केला. विलासरावांच्या कृपेने आवळेंच्या गळ्यात लातूरच्या खासदारकीची माळ पडली.
लातूर जिल्ह्यातील नेत्यांना केंद्रात मंत्रीपदं मिळाली. पण त्याचा उपयोग लातूरकरांना फारसा होऊ शकला नाही.. मी देश पातळीवरचा नेता आहे असं सांगणारे शिवराज पाटील चाकूरकर तसे लातूरकरांना कधी जवळचे वाटले नाहीत. प्रश्न रस्त्याचा, खड्ड्यांचा किंवा विकासाचा असो.
चाकूरकर म्हणायचे आमचे काम फक्त कायदे करणे, हे आहे. खड्ड्यांचा प्रश्न नगरपालिकेला सांगा. रस्त्याचा प्रश्न आमदारांना सांगा. विकासाचा प्रश्न विलासरावांना सांगा किंवा आणखी कुणाला... माझा आणि त्याचा संबंध नाही अशी त्यांची नेहमीचीच भूमिका.
 
काँग्रेसचा पारंपरिक गड असणा-या लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आवाका अजून विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांनाही आलेला नाही. त्यामुळेच त्यांना राजकारणात त्यांच्या बंधूचीही मदत घ्यावी लागते. धीरज आणि अमित आता मतदारसंघाची मशागत करत आहेत खरे. मात्र आमदार अमित देशमुखांनाही एन्टी इन्कंबन्सी फँक्टर लागू पडतो.. या सगळ्या राजकारणाच्या गुंतागुंतीत काँग्रेस आपला गड कसा राखणार, हाच महत्वाचा प्रश्न आहे.
 
जयवंत आवळे यांची राजकीय ओळख
2009 मध्ये लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस बाकी असताना विलासराव देशमुखांनी जयवंत आवळेंना बोलावून घेतलं... आणि तुम्हाला लातूरमधून निवडणूक लढवायची आहे, असं सांगितलं. आवळेंना मराठवाड्याचा काहीही गंध नव्हता. फक्त विलासरावांनी निवडलेला आणि प्रतिष्ठेपोटी निवडून आणलेला खासदार म्हणजे जयवंत आवळे
नाव --जयवंत गंगाराम आवळे
जन्म 6 जुलै 1940
शिक्षण -- बारावी
कोल्हापुरातील वडगाव मतदारसंघातून तब्बल पाच  वेळा विधानसभेवर निवडून आलेले जयवंत आवळे हे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
 
1980, 85, 90, 95,99  असे पाच वेळेस आवळे वडगाव मतदारसंघातून आमद