जळगाव जिल्ह्यातील बिग फाईट

एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यायत.

Updated: Apr 21, 2014, 05:46 PM IST

www.24taas.com , विकास भदाणे, जळगाव
एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यायत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष जैन हा श्रीमंत आणि तगडा उमेदवार, तर लेवापाटील समाजाचे डॉ. उल्हास पाटील हे अपक्ष उमेदवार असल्याने खडसे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई समजली जातेय.
विधान परिषदेत मुलगा निखील खडसेंचा राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांनी केलेला पराभव एकनाथ खडसेंच्या चांगलाच जिव्हारी लागला. हीच सल मनात ठेऊन खडसेंनी एका दगडात दोन पक्षी मारायचं ठरवलंय. यावेळी त्यांनी आपली सून रक्षा खडसे यांना लोकसभेवर पाठउन मुलाच्या पराभवाचा बदला तर घेतलाच शिवाय आपला राजकीय वारसदारही निर्माण केलाय.
अभी नही तो कभी नही, असं म्हणत खडसेंनी आपली संपूर्ण ताकद रक्षा खडसेंच्या पाठीशी लावलीये. इतकंच नाही रक्षा यांच्या प्रचारासाठी अख्ख खडसे कुटुंब सक्रीय पणे प्रचारात सहभागी झालंय.
राष्ट्रवादीचे मनीष जैन तर डॉ. उल्हास पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उतरलेत. इथलं सामाजिक समिकरण पाहाता डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढलीये.
कारण हे दोनही उमेदवार लेवापाटीदार समाजाचे आहेत. त्यामुळे मनिष जैनांपेक्षा डॉ. उल्हास पाटील यांचं आव्हान रक्षा खडसेंना भारी पडण्याची शक्यता आहे. खडसें प्रमाणेच डॉ. पाटील यांचे कुटुंबीयही सध्या प्रचारात आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता हा अंतिम टप्पा आहे त्यात खडसे आणि डॉ. पाटील कुटुंबियांनी जोरदार मेहनत यावेळी घेतलीय गेल्या महिनाभर त्यांनी मागितलेला हा मतांचा जोगवा किती प्रमाणात मतदारांना भुरळ घालतो हे पाहन आता उत्सुकतेच राहणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.