महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील `बीग फाईटस्`

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालंय. महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. पाहुयात... पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील बिग फाइट

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 5, 2014, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालंय. महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली-चिमूर या १० मतदारसंघांचा समावेश आहे.

पाहुयात... पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील बिग फाइट
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ
प्रतापराव जाधव, शिवसेना विरुद्ध कृष्णराव इंगळे, राष्ट्रवादी
अमरावती लोकसभा मतदारसंघ
आनंदराव अडसूळ, शिवसेना विरुद्ध नवनीत कौर, राष्ट्रवादी
रामटेक लोकसभा मतदारसंघ
मुकुल वासनिक,काँग्रेस (शक्यता) विरुद्ध कृपाल तुमाने, शिवसेना
नागपूर लोकसभा मतदारसंघ
नितीन गडकरी, भाजप विरूद्ध अंजली दमानिया, आप विरूद्ध विलास मुत्तेमवार, काँग्रेस
भंडारा लोकसभा मतदारसंघ
प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी विरूद्ध प्रशांत मिश्रा,आप विरूद्ध नाना पटोले, भाजप
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
हंसराज अहिर, भाजप विरूद्ध वामनराव चटप, आप विरूद्ध संजय देवतळे (शक्यता) काँग्रेस
यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
भावना गवळी, शिवसेना विरूद्ध काँग्रेस निश्चित नाही
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ
अशोक नेते, भाजप विरूद्ध मारोतराव कोवासे, काँग्रेस

पहिल्या टप्प्यात अधिसूचना जारी करण्याची तारीख आहे १५ मार्च तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल २२ मार्च... या टप्प्यातील इच्छुक उमेद्वारांच्या अर्जांची छाननी २४ मार्चपर्यंत होईल तसंच २६ मार्चपर्यंत या टप्प्यातील उमेद्वारांना अर्ज मागे घेता येऊ शकतील. १० एप्रिलमध्ये या टप्प्यातील मतदार आपली मतं नोंदवतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.