आधी बोटावर शाई; मग, लगीनघाई!

नागपूरमध्ये मतदार किती जागरुक आहेत त्याचं उदाहरण आज पाहायला मिळालं. बोहल्यावर चढलेली वधू आपलं लग्न मागे ठेऊन पहिल्यांदा मतदान केंद्रावर जाऊन उभी राहिली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 10, 2014, 02:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरमध्ये मतदार किती जागरुक आहेत त्याचं उदाहरण आज पाहायला मिळालं. बोहल्यावर चढलेली वधू आपलं लग्न मागे ठेऊन पहिल्यांदा मतदान केंद्रावर जाऊन उभी राहिली.
नागपूरच्या दिघोरी भागात राहणाऱ्या दीपाली मेश्राम या तरुणीचं आज लग्न आहे. मात्र, लग्नाला हॉलवर जाण्याआधी तिनं आपला मतदानाचा हक्क बजावला. बोटावर शाई लावून दीपालीनं आपला मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. वैभवनगर शाळेतल्या मतदान केंद्रावर जाऊन तिनं मतदान केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यावेळीही ती नववधूच्या वेषात होती.
व्हिडिओ : नववधूचं मतदार म्हणून पहिलं कर्तव्य...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.