राजकडे दुबईत मॉल घेण्यासाठी पैसे कुठून आले?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रमेश किणी प्रकरण काढण्याची भुजबळ धमकी देतात, मी तेलगी प्रकरण काढायचं का, असं इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

Updated: Apr 21, 2014, 10:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. रमेश किणी प्रकरण काढण्याची भुजबळ धमकी देतात, मी तेलगी प्रकरण काढायचं का, असं इशारा राज ठाकरेंनी दिला होता, यानंतर भुजबळांनी राज ठाकरेंवर आरोप केले आहेत.
राज ठाकरेंनी शनिवारी नाशिकच्या सभेत भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्या आणि इतर मुद्यावर सवाल केले होते. छगन भुजबळांनी आजच्या भाषणात आक्रमक होत राज ठाकरेंवरही आरोप केले आहेत.
दुबईत मॉल घेण्यासाठी राज यांनी संपत्ती कुठून आणली? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तसेच राज ठाकरे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय.
`कृष्णकुंज`पासून दोन पावलावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर कधी गेला होतात का? असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.