काँग्रेसचा जाहीरनामा विकास मॉडेल - सोनिया गांधी

युपीएच्या काळात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. काँग्रेसचं विकास मॉडेल सर्वोत्तम आहे. जाहीरनाम्यासाठी 10,000 लोकांशी चर्चा केली. त्यातून हा जाहीर तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा 2014 च्या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 26, 2014, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
युपीएच्या काळात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. काँग्रेसचं विकास मॉडेल सर्वोत्तम आहे. जाहीरनाम्यासाठी 10,000 लोकांशी चर्चा केली. त्यातून हा जाहीर तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा 2014 च्या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जाहीरनाम्यासाठी काँग्रेसचा आपकी आवाज, हमारा संकल्प असा नाराही दिलाय... जाहीरनाम्यामध्ये समाजातल्या प्रत्येकाला घर, औषध आणि पेंशन देण्याचं आश्वासन यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिलंय. समाजातल्या प्रत्येकाचा विकास होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असंही आश्वासन देण्यात आलंय.
जाहीरनाम्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच महिन्यांमध्ये देशभरात २७ दौरे करुन 10 हजार लोकांशी चर्चा केलीय. `आम आदमी के बढते कदम, हर कदम पर भारत बुलंद` असा नारा देत काँग्रेसनं 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मोठी आश्वासनं दिली होती. त्याचं काय झालं, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
आरोग्य सेवा आणि रोजगाराला कायदेशीर अधिकारांच्या कक्षेत आणण्याची मुख्य घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यात खासगी क्षेत्रामध्ये अनुसूचीत जाती आणि जमातींना आरक्षणाचीही घोषणा केली गेली आहे. महिला आरक्षण विधेयक मुंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्येक राज्यात एका वर्षात लोकायुक्त नियुक्त करण्याचा मुद्याही मांडण्यात आला आहे. 100 दिवसांत महागाई कमी करणार ही घोषणा त्यांनी पुन्हा दिली आहे. यावरुन विरोधक त्यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरकार आले तर, सर्वांना घर आणि सर्वांना निवृत्ती वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासोबतच 20 वर्षे एकाच घरात भाड्याने राहिले तर त्यावर मालकी हक्क देण्याचेही वचन काँग्रेसने दिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.