सिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, April 14, 2014 - 09:13

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
सिन्नरचे आमदार आणि नारायण राणे यांचे कट्टर समर्थक माणिकराव कोकाटे यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून मंगळवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला समर्थन द्यायचा निर्णय घेणार असल्याच जाहीर केल्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यामधे अस्वस्थता पसरली आहे.
राज्यात राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळत नाही. भुजबळ आमचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कोकाटे यांनी या आधीही केलाय. मात्र आता सिंधुदुर्गच्या वादाची किनार लाभल्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ झालिय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014 - 09:12
comments powered by Disqus