दिग्गीराजा होणार दुल्हेराजा, दिग्गींचे संबंध अखेर उघड

Last Updated: Wednesday, April 30, 2014 - 14:32

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीव्ही अँकर अमृता रायसोबतचे संबंध अखेर दिग्विजय सिंह यांनी मान्य केले आहेत. अमृता राय यांच्यासोबत असलेले संबंध ही आपली खासगी बाब आहे, तसेच अमृता रायने आपल्या पतीशी कायदेशीर फारकत घेतली असल्याचं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे अमृता राय यांनीही याविषयी ट्वीट केलं आहे. मी आपल्या पतीशी कायदेशीर मार्गाने दूर होणार आहे. तसेच दिग्विजय सिंह यांच्याशी आपण लवकरच विवाह करणार असल्याचंही अमृता राय यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह आणि टीव्ही अँकर अमृता राय यांचे संबंध मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आले होते. दिग्विजय सिंह आणि अमृता राय यांचे फोटो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात फिरत होते.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अमृता राव आणि दिग्विजय सिंह यांनी 2013 मध्ये आळंदीत एकत्र पुजा करतांना दिसल्याचं यू-ट्यूबवरील एका व्हिडीओत म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014 - 13:52
comments powered by Disqus