काँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 8, 2014, 05:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.
उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेले निरुपम यांनी म्हटलं की, समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेसनं घेतलेल्या अनेक निर्णयांनंतरही यूपीए सरकारला मतदारांचा भयंकर रोष सहन करावा लागला. ते म्हणाले, “आम्ही 10 वर्ष सत्तेत होतो आणि अनेक कारणांनी काँग्रेस विरोधात जनतेत राग होता. काँग्रेस विरोधात इतकी मोठी भावना निर्माण झाली होती, कि नरेंद्र मोदींनी जरी काँग्रेसच्या तिकीटावरक निवडणूक लढवली असती. तर ते सुद्धा वाईट हरले असते.”
लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्र निवडणुकीत मात्र असे निकाल येणार नाहीत, असंही संजय निरुपम म्हणाले. राज्यात वर्ष अखेरीस विधानसभा निवडणूक होतेय. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 282 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस फक्त 44 जागांवर जिंकली.
संजय निरुपम पुढे म्हणाले, ही निवडणूक जरा वेगळीच होती. यूपीएच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात काही असे निर्णय घेतले गेले ज्यामुळं जनतेत नारजी पसरली होती. महागाई आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे भाजपनं चढवून पुढे आणले. मात्र प्रत्येक निवडणूक काहीतरी वेगळं शिकवतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.