लोकसभा निवडणूक २०१४: २ वाजेपर्यंत त्रिपुरात ६० टक्के मतदान

२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 7, 2014, 04:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गुवाहाटी
२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहिल्या मिळतायत. आसाममध्ये १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झालंय. तर त्रिपुरात दोन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झालंय.
आतापर्यंत कुठंही अनुचित प्रकार घडलेला नाही. मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.