मुंडेंनी पाठिंब्यासाठी चार फोन केले - राज ठाकरे

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना आपण त्यांच्या विनंतीवरून पाठिंबा दिला आहे. मुंडेंनी पाठिंब्यासाठी चार वेळेस फोन केले, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोगेश्वरीच्या जाहीर सभेत सांगितलं आहे.

Updated: Apr 16, 2014, 07:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना आपण त्यांच्या विनंतीवरून पाठिंबा दिला आहे. मुंडेंनी पाठिंब्यासाठी चार वेळेस फोन केले, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोगेश्वरीच्या जाहीर सभेत सांगितलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी आव्हान उभं केलं आहे. या सामाना मुंडे विरूद्ध पवार असल्याचं सांगण्यात येतंय.
गोपीनाथ मुंडे हे चार दिवसांपूर्वी बोलले होते, मला मनसेची गरज नाही, आणि सकाळीच फोन आला, बीडमध्ये तुमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, तुमचा पाठिंबा आम्हाला द्या, अशी विनंती गोपीनाथ मुंडेंनी केली म्हणून, मी बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा दिला, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
चार दिवसांपूर्वी मनसेची गरज नाही, म्हणणारे पाठिंब्यासाठी फोन का करतात, असा सवालही राज ठाकरे यांनी सभेत बोलतांना उपस्थित केला.
मनसेचे खासदार निवडणून आले, तर आम्ही एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार आहोत, महाराष्ट्राची व्यथा दिल्लीत पोहोचवण्यासाठी मनसे लोकसभा लढवत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
मी राजनाथ सिंह यांना पाठिंबा दिलेला नाही, नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे, यामुळे राजनाथ सिंहांनी यावर काही बोलू नये, कारण नरेंद्र मोदी यावर काही बोलत नाहीत, असंही राज यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही मनसेचा पाठिंबा मागितला नव्हता, मनसे बिन बुलाये मेहमान असल्याची टीका राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.