बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा मोदींची फॅन

By Surendra Gangan | Last Updated: Friday, May 2, 2014 - 14:27

www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची फॅन आहे. वाराणसीमध्ये आज आलेल्या प्रीतीनं मोदींना पाठिंबा दिलाय. देशाला कणखर नेतृत्त्वाची गरज असल्याचं प्रीतीनं सांगितलंय.
मोदी यांना मानणाऱ्यांमध्ये आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. प्रीती झिंटा मोदींची फॅन झालेय. मोदीच वाराणसीतून निवडून आल्यानंतर पंतप्रधान होतील, असं ती म्हणाली.
मोदींनी गुजरातमध्ये चांगले काम केले आहे. मला खात्री आहे की, ते यापेक्षाही चांगले काम करतील. ते चांगल्या मतांनी जिंकतील. त्यांच्यासाठी प्रचार करण्याची गरज नाही. मी वाराणसी येथे देवाकडे प्रार्थना करण्यासाठी आली आहे. सात वर्षांपूर्वी मोदी पंतप्रधान झाले असते तर लोक त्यांच्यावर प्रेम करीत राहिले असते, असे प्रीतीने म्हटले.
लोक त्यांच्यावर प्रेम करीत आहेत. मला तसे वाटत आहे की, लोक त्यांच्यावर प्रेम करीत आहेत. मोदी पंतप्रधान व्हायलाच पाहिजेत. बनारसमधून मोदी जिंकतील. तसेच मी आम आदमी पार्टीलाही पसंत करीत आहे. त्यांना आणखी वेळ हवा आहे. त्यांना या निवडणुकीत जागा मिळणे महत्वाचे आहे, प्रीतीने सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014 - 14:27
comments powered by Disqus