फेसबुकचं इंडिया इलेक्शन ट्रॅकर लॉन्च

लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीसाठी सोशल नेटवर्किग साईट फेसबुकने आपली तयारी पूर्ण केली आहे.

Updated: Mar 5, 2014, 08:32 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीसाठी सोशल नेटवर्किग साईट फेसबुकने आपली तयारी पूर्ण केली आहे.
लोकसभा निवडणुकींचा विचार करून इंडिया इलेक्शन ट्रॅकर लॉन्च करण्यात आलं आहे.
या ट्रॅकरच्या माध्यमातून उमेदवारांच्या सोशल नेटवर्किंग फेसबुकवरील हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
तसेच फेसबुक इंडियाच्या नव्या डॅशबोर्डवरून निवडणुकीतली चर्चा, हालचालीचं लाईव्ह अपडेट मिळणार आहे. याशिवाय महत्वाच्या विषयांवर पोलही घेण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याला 9.3 कोटी नेटीझन्स भारतातून फेसबुकवर सक्रीय असतात, अशी माहिती भारताच्या दक्षिण आशियाच्या पब्लिक पॉलिसीच्या डिरेक्टर अनखी दास यांनी दिली आहे.
फेसबुकने नेहमीच या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं आहे की, लोकांचे विचार, त्यांच्या गोष्टी फेसबुकवर शेअर कऱण्यास त्यांना अधिक सक्षम करणे, या माध्यमातून जगाला अधिक मुक्त आणि आपसात जोडण्याचा उद्देश फेसबुकचा आहे, असंही दास यांनी म्हटलंय.
फेसबुकने काही दिवसांपूर्वी फेसबुक टॉक ही सुरू केलं होतं. या माध्यमातून फेसबुक युझर्सना लोकसभा निवडणुकीसाठी बोलतं करण्याची एक योजना आहे. पत्रकार मधू त्रेहन ही चर्चा घडवून आणणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.