भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग बंडाच्या पवित्र्यात

भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांना बारमेरमधून भाजपचं तिकीट नाकारण्यात आल्यानं ते आता बंडाच्या पवित्र्यात असल्याचं समजतंय. भाजपाला सोडसिठ्ठी देण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येतायत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2014, 05:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांना बारमेरमधून भाजपचं तिकीट नाकारण्यात आल्यानं ते आता बंडाच्या पवित्र्यात असल्याचं समजतंय. भाजपाला सोडसिठ्ठी देण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येतायत.
जसवंत सिंग यांनी याबाबत आपण २४ तारखेला निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ही लढाई ख-या आणि खोट्या भाजपमध्ये असल्याचंही ते म्हणाले आहेच. दरम्यान, जसवंत सिंग आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय.
सध्याचा भाजप हा पक्ष ‘असली’ आणि ‘नकली’ असा विभागला गेला आहे. बाहेरून आलेल्या लोकांनी असली भाजपवर अतिक्रमण केले आहे, असे सिंग म्हणाले.
सिंग यांनी बारमेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्यांच्याऐवजी कर्नल सोनाराम चौधरी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सिंग पक्षावर हे नाराज आहेत. जसवंत सिंग हे सध्या दार्जीलिंगमधून लोकसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
बारमेर हा सिंग कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून सिंग यांचे पुत्र मानवेंद्र सिंग यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती. तर २००४मध्ये त्यांनी विजयही मिळवला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.