पी. चिदंबरम - काँग्रेसची जमेची बाजू आहे का?

अर्थमंत्री पी चिदंबरम भारतीय राजकारणातलं अभ्यासू व्यक्तिमत्व मानलं जातं. मात्र यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे, त्यांच्या जागी त्यांनी आपल्या मुलाला संधी दिली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 06:21 PM IST

अर्थमंत्री पी चिदंबरम भारतीय राजकारणातलं अभ्यासू व्यक्तिमत्व मानलं जातं. मात्र यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे, त्यांच्या जागी त्यांनी आपल्या मुलाला संधी दिली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनही सांगण्यात आलं आहे की, पी चिदंबरम यांची पंतप्रधानपद भूषवण्याची कोणतीही इच्छा नाही. मात्र तरीही गांधी परिवाराशी पी चिदंबरम यांचे असलेले संबंध त्यांना कामी येण्याची इच्छा नाकारता येत नाही, जर काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्तेची सूत्र आली, तर पी चिदंबरम यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळू शकते.
पी. चिंदबरम यांनी 2004 ते 2014 या काळात केंद्रीय मंत्रिपद भूषवलं, तसेच ते 2004 ते 2008 या काळात केंद्रीय अर्थमंत्रीपदी होते.
26/11 च्या मुंबई हल्ल्यात शिवराज पाटील हे वादात आल्यानंतर, चिदंबरम यांनी डिसेंबर 2008 पासून ते जुलै 2012 पर्यंत केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कारभार पाहिला. यानंतर प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अर्थमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली.
पी.चिदंबरम यांची अर्थमंत्रीपदाची कारकीर्द ही, गृहमंत्रीपदापेक्षा अधिक सक्षम समजली गेली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.