प्रकाश करात – थर्ड फ्रंट चालणार का?

प्रकाश करात हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश करात यांनी १४ राजकीय पक्षांना एका छताखाली आणले आहे. भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच थर्ड फ्रंटचा उद्देश आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 06:11 PM IST

प्रकाश करात हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश करात यांनी १४ राजकीय पक्षांना एका छताखाली आणले आहे. भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच थर्ड फ्रंटचा उद्देश आहे.
चार डावे पक्ष, समाजवादी पक्ष, एआयडीएमके, जनता दल (युनायटेड), आसाम गण परिषद, जनता दल सेक्युलर, झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल मिळून तिसरी शक्ती निर्माण केली आणि दोन राष्ट्रीय पक्षांना पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
तिसऱ्या आघाडीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुलायम सिंग यादव आणि जे. जयललिता यांना पाहिले जाते. पण जेव्हा १९९५-९६ मध्ये तिसरी आघाडी स्थापन झाली. तेव्हापासून मतदारांना आकर्षित करण्यात त्यांना अपयश आले आहे. आगामी निवडणुकांमध्ये या तिसऱ्या आघाडीला काही यश मिळण्याच्या शक्यता कमी दिसत आहेत. यातील बहुतांशी राजकारणी हे संधीवादी राजकारणी म्हणून राजकीय पटलावर प्रसिद्ध आहेत.
भारत-अमेरिका अणू करारावरून डाव्या पक्षांनी केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडल्यानंतर कम्युनिस्ट नेत्यांचा प्रभाव देशभरातून कमी झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारले पाडले. त्याच ठिकाणी डाव्या पक्षांना जबरदस्त धक्का बसला.
करात यांचा जन्म ७ फेब्रवारी १९४८ रोजी झाला. त्यांनी मद्रास ख्रिचन कॉलेजमधून अर्थशास्त्रातून बी.ए शिक्षण पूर्ण केले. त्यांनी स्कॉटलंड येथील इडनबर्ग विद्यापीठातून राज्यशास्त्रातून एम.एस्सी केले. वर्णभेदाविरोधी आंदोलन केल्यामुळे त्यांना १९७० मध्ये विद्यापीठातून रेस्टीकेट करण्यात आले होते.
सीपीआय(एम) महासचिव पहिल्यांदा १९८५ मध्ये पक्षाच्या केंद्रीय समितीवर निवडून आले. त्यानंतर त्यांना पॉलिट ब्युरोवर १९९२ मध्ये निवडून गेले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.