नमोंचा उमेदवारी अर्ज, वाराणसीत रोडशो, जनसागर रस्त्यावर

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 24, 2014, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
आतापर्यंत मला वाटत होते की मला पक्षाने पाठविले आहे, पण आता मला वाटते की, मला पक्षाने नाही पाठवले मला गंगा माईने बोलावले आहे. मी कायम येथील गंगा युमनेच्या शिकवणीची सेवा करणार, असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले.
विणकरांच्या बाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, वाराणसीच्या विणकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर ते जगात आपले नाव निर्माण करू शकतात, विणकरांना औद्योगिक, ब्रँडिंग आणि अपग्रेडिंगची सुविधा दिली तर तर ते देशाचे नाव सर्व जगात पसरवू शकतात.
गंगेच्या स्वच्छतेसाठी मोदींनी सांगितले की, साबरमती नदीसाठी गुजरातमध्ये जसे काम झाले तसेच काम या ठिकाणीही गंगेसाठी होऊ शकते. ईश्वर मला शक्ती देवो की मी काशीवासियांची सेवा करू शकेन, असेही मोदी यांनी सांगितले.

13: 40: मोदींचा रोडशो संपला. आता ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात पोहचले. काही वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
13: 08: मिंट हाऊसवरून हळूहळू मोदींचा रथ पुढे सरकतो आहे. मोदी थोड्या वेळात उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोदींचे वाहने पुढे सरकरविण्यासाठी पोलिसांना मेहनत करावी लागत आहे.
12:16 : मोदीसह रोड शोमध्ये अमित शाह, रवि शंकर प्रसाद, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि इतर नेते उपस्थित आहेत. रोड शोमध्ये जनसागर
11:54 : मोदींचा रोड शो सुरू... मोदी मलदहियापासून कँटोन्मेंटयेथील मिंट चौकापर्यंत सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रोड शो करणार आहेत.
11:34 : वाराणसीच्या मलदहिया चौकापासून नरेंद्र मोदींनी आपला रोड शो सुरू केला. या दरम्यान रस्त्यांवर संपूर्ण भगवा रंग दिसतो आहे.
11:28 : मोदी काशी विद्यापीठात पोहचले. मोदींनी सरदार पटेलांच्या पुतळ्याला माल्यार्पण केला. थोड्या वेळात त्याचा रोड शो सुरू होणार.
11:04 : मोदींनी बनारस हिंदू विद्यापीठात पोहचून मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले. त्यानंतर त्यांनी हात हलवून नागरिकांना अभिवादन केले.
10:52 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदी बनारस हिंदू विद्यापीठात पोहचले. मोदी या ठिकाणी हेलीकॉप्टरने पोहचले.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांचं मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन दिसून आलं आहे. यावेळी बनारसमध्ये जागोजागी भाजपाच्या टोप्या आणि हातात झेंडे घेऊन कार्यकर्ते दिसतायत. जास्तच जास्त दुकानं बंद आहेत, शहरात ऑटो रिक्षाही कमी प्रमाणात धावताय.
वाराणसीत काल अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली होती, आजही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे.