भाजपचे दोन उमेदवार जाहीर, पुणे-लातूरचा प्रश्न सुटला

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. पुण्यातून अनिल शिरोळे तर लातूरमधून सुनील गायकवाड यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2014, 09:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. पुण्यातून अनिल शिरोळे तर लातूरमधून सुनील गायकवाड यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.
पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी अनिल शिरोळे यांच्यासह गिरीश बापट आणि प्रकाश जावडेकर यांची नावं चर्चेत होती. अखेर भाजप नेतृत्त्वानं शिरोळेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. तर लातूरमधून सुनील गायकवाड यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.
- अनिल शिरोळे पुण्यातील
भाजपचे उमेदवार
- भाजप नेतृत्त्वाने केले
शिरोळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
- पुण्यातील भाजप उमेदवाराचा
प्रश्न सुटला
- लातूरमधून सुनील गायकवाड
यांना उमेदवारी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.