काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 8, 2014, 10:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.

दरम्यान, काँग्रेसच्या यादीत ३५ टक्के उमेदवार ५० टक्क्यांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर २८ महिलांनाही संधी दिलीय. उमेदवारी दिलेल्यांमध्ये प्रामुख्यानं नंदन निलकेणींना दक्षिण बंगळुरुमधून तिकीट दिलंय. तर क्रिकेटर मोहम्मद कैफ उत्तर प्रदेशातून फुलपूरमधून लढणार आहे.
पहिल्या यादीत काँग्रेसनं पुणे आणि नांदेड या मतदारसंघांबाबत कोणाताही निर्णय अद्याप घेतलेला नसल्याने अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात कोणाला कोणत्या मतदार संघातून उमेदवारी?
1) सुशीलकुमार शिंदे- सोलापूर
2) माणिकराव गावित - नंदुरबार
3) मुकुल वासनिक - रामटेक
4) प्रिया दत्त - उत्तर मध्य मुंबई
5) संजय निरुपम - उत्तर मुंबई
6) मिलिंद देवरा - दक्षिण मुंबई
7) गुरुदास कामत - वायव्य मुंबई
8) एकनाथ गायकवाड - दक्षिण मध्य मुंबई
9) विलास मुत्तेमवार - नागपूर
10) अमरिश पटेल - धुळे
11) भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी
12) प्रतिक पाटील - सांगली
13) डॉ.निलेश राणे - रत्नागिरी-सिंधुदुर्ग

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.