अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 2, 2014, 01:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.
राखी सावंत (राष्ट्रीय आम पक्ष, उत्तर मुंबई)
बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतही निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय. राखी सावंतनं वायव्य मुंबईतून काल उमेदवारीसाठी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना राखीनं आपण अशिक्षित असल्याचं म्हटलंय. मात्र तिच्याकडे १४.६९ कोटींची संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात असल्याचं म्हटलंय.
राखीकडे ११.१२ कोटींची स्थावर तर३.५७ कोटींची जंगम मालमत्ता आहे. ९६ हजार ४२७ रुपये नगद आणि ३९.१३ लाखांची मुदत ठेव आहे. तसंच ६१.२६ लाखांचे रोखे आणि समभाग, तर २.१२ कोटींचा विमा आणि पोस्ट बचत आहे. राखीकडे २१ लाखांची फोर्ड एंडेव्हर कार तसंच ७.५५ लाखांचे दागिने आहेत. विशेष म्हणजे राखीवर २.५२ कोटीचं कर्जही आहे. विशेष म्हणजे राखीवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल आह़े.
संजय निरुपम (काँग्रेस, उत्तर मुंबई)
- ५३ लाख ९३ हजार ७३० रुपयांची जंगम मालमत्ता
- ४७ लाख ८६ हजार ८७८ रुपयांची स्थावर मालमत्ता
- पत्नीच्या नावावर ५९ लाख ४ हजार २६४ रुपयांची जंगम.
- मुलगी-आईच्या नावावर ३४ लाख रुपये
- ४३ लाख २८ हजार ५२२ रुपयांची स्थावर संपत्ती, जमिनीचे मूल्य दोन कोटी
- सात लाख ८६ हजारांचे सोने
गोपाळ शेट्टी (भाजप, उत्तर मुंबई)
- ९३ लाख ८४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता
- पत्नीच्या नावे २ कोटी ४६ लाख ५२ हजार रुपयांची मालमत्ता
- आईच्या नावावर ४ लाख १५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता
- ११ लाखांचे सोने. बदलापुरात २५ लाख रुपये किमतीची दीड एकर जमीन
- कांदिवलीतील घराची किंमत ४० लाख रुपये
- स्थावर मालमत्ता ६५ लाख
गुरुदास कामत (काँग्रेस, वायव्य मुंबई)
- स्वत:च्या नावावर सहा कोटींची जंगम मालमत्ता
- पत्नीच्या नावे पाच कोटी ८२ लाखांची मालमत्ता, १० कोटीचे घर
- बँकेत साडेपाच कोटींच्या ठेवी २७ लाख रुपये किमतीचे सोने
- जमिनींची किंमत २० लाख रुपये
- वरळीतील घराची किंमत तीन कोटी रुपये
- दिल्लीतील घराची किंमत २६ कोटी रुपये

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.