पराभवाची बातमी दाखवली, लोकसभा टीव्हीच्या साईओंची हकालपट्टी

लोकसभा टीव्हीचे साईओ राजीव मिश्रा यांना शुक्रवारी त्यांच्या पदावरून अचानक हटवण्यात आलं आहे.

Updated: May 31, 2014, 06:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा टीव्हीचे साईओ राजीव मिश्रा यांना शुक्रवारी त्यांच्या पदावरून अचानक हटवण्यात आलं आहे.
राजीव मिश्रा यांच्या मते, लोकसभा निवडणूक निकालाच्या वेळी मीरा कुमार यांच्या पराभवाची बातमी दाखवल्यानं त्यांना हटवण्यात आलं आहे.
राजीव मिश्रा हे 16 डिसेंबर 2011 पासून लोकसभा टीव्हीचे सीईओ होते. विशेष म्हणजे राजीव मिश्रा यांना अशा वेळी हटवण्यात आलं आहे.
जेव्हा 15 वी लोकसभा विसर्जित करण्यात आली आहे. स्पीकर मीरा कुमार यांचा कार्यकाळ लोकसभा स्पीकर म्हणून संपणार आहे.
सोळाव्या लोकसभेत 6 जून रोजी नव्या स्पीकरची निवड होणार आहे.
राजीव मिश्रा यांनी सांगितलंय, मला काहीही सांगण्यात आलेलं नाही, लोकसभा इंफ्रानेट वेबसाईटवर एक नोटीफिकेशन टाकण्यात आलं आहे. आता नवीन स्पीकर येणार असल्याने मी हैराण आहे.
कामावर घेण्याची एक प्रक्रिया असते, तशी काढून टाकण्याची असते, पण मला काहीही सांगण्यात आलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.