दक्षिण मध्य मुंबई - तिरंगी लढतीतील जातीय समीकरणं

दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत होतंय. विविध जाती-धर्मातील लोक इथं राहत असल्यानं निवडणुकीत जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 18, 2014, 09:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत होतंय. विविध जाती-धर्मातील लोक इथं राहत असल्यानं निवडणुकीत जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आलंय. विजयी हॅट्ट्रीक करण्यासाठी सज्ज झालेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांपुढं सेना-मनसेनं आव्हान उभं केलंय.  
पंधरा लाखांहून अधिक मतदारसंख्या असलेल्या दक्षिण मध्य मुंबईत मराठी मतदार ३२ ते ३५ टक्के, मुस्लिम मतदार २० ते २२ टक्के, दक्षिण भारतीय मतदार १६ ते १८ टक्के, उत्तर भारतीय मतदार ८ ते १० टक्के, गुजराती मतदार ८ टक्के आहेत. दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात मराठीबरोबरच दक्षिण भारतीय, मुस्लिम आणि दलित मतदारांचे प्राबल्य दिसून येते. त्यामुळं मिश्र लोकसंख्येच्या या मतदारसंघात जातीय समीकरणं प्रभावी ठरतात. चेंबूर, धारावीत दलित मतदारांची संख्या अधिक आहे. जी नेहमी काँग्रेसच्या पाठिशी राहिली आहे. अणुशक्तीनगरमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. इकडं एकनाथ गायकवाडांचा जनसंपर्क कमी असला तरी ही मते सेना-मनसेकडं वळण्याची शक्यता नाही. धारावी, माटुंगा, वडाळ्यात दक्षिण भारतीय समाजाचे प्रमाण अधिक आहे. दादर,माहिम या मराठी पट्टयात मनसेची चांगली ताकद आहे.
शिवसेना उमेदवार - राहुल शेवाळे यांच्या
तरुण, उच्चशिक्षित आणि दलित चेहरा, बीएमसीच्या स्थायी समिती अध्यक्ष कार्यकाळात केलेली कामे, ३७ पैकी १७ नगरसेवक महायुतीचे, काँग्रेसविरोधी नाराजीचा आणि मोदी फॅक्टरचा फायदा होईल, आरपीआयच्या युतीमुळं दलित मते वळतील, सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेत आल्याचा दादरमध्ये फायदा होईल. काही गोष्टी राहुल शेवाळेंना मायनस ठरणाऱ्या आहेत. दलित असले तरी दलित चेहरा म्हणून ओळख नाही, मतदारसंघात महायुतीचा एकही आमदार नाही, मनसे उमेदवाराचा फटका बसेल, पक्षांतर्गत वादाचा फटका बसू शकतो. 
काँग्रेस उमेदवार - एकनाथ गायकवाड
काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या जमेच्या बाजू पाहूयात. लो प्रोफाईल राजकारणी, राजकारण व निवडणुकांचा अनुभव, धारावीत चांगला होल्ड, तळागाळातील कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क, झोपडपट्ट्यांमधील काँग्रेसचा पारंपरिक मतदार, पारंपरिक मुस्लिम मतदार, आघाडीच्या पाच आमदारांची मदत एकनाथ गायकवाडांच्या उणिवांमध्ये रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प, काँग्रेस विरोधी नाराजी, दादर, चेंबूर, अणुशक्तीनगर भागात कमी जनसंपर्क, काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण या गोष्टी आहेत.
मनसे उमेदवार - आदित्य शिरोडकर
मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या जमेच्या बाजूंमध्ये तरुण व उच्चशिक्षित चेहरा, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम, दादर, माहिमध्ये पक्षाची चांगली ताकद या बाबी आहेत. आदित्य शिरोडकरांच्या काही उणिवाही समोर येतात. राजकारणाचा अनुभव नाही, माहिम वगळता  पक्षाची इतरत्र ताकद नाही, केवळ राज ठाकरे करिष्म्यावर भिस्त आहे.
इतर
आपचे सुंदर बालकृष्षन आणि बसपाचे गणेश अय्यरही इथून रिंगणात असले तरी त्यांची इथं डाळ शिजण्याची जराही शक्यता नाही.
या मतदार संघातील काँग्रेस - शिवसेना - मनसे अशी तिरंगी लढत पाहण्यासारखी ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.