LIVE -निकाल औरंगाबाद

प्रोफाईल मतदारसंघाचं : औरंगाबाद

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 10:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
दुपारी 05.00 अपडेट औरंगाबादमधून> चंद्रकांत खैरे 7 हजार मतांनी आघाडीवर

मतदारसंघ : औरंगाबाद
मतदान दिनांक : २४ एप्रिल
एकूण मतदान : 59 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस/राष्ट्रवादी – नितीन पाटील (काँग्रेस)
महायुती – चंद्रकांत खैरे (शिवसेना)
आप – सुभाष लोमटे
अपक्ष - उत्तमसिंग पवार
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
चंद्रकांत खैरे – शिवसेना – २,५५,८९६ मतं – ३५.००%
उत्तमसिंह पवार - काँग्रेस – २,२२,८८२ मतं – ३०.४८%
मौनगिरीजी शांतीगिरी महाराज - अपक्ष – १,४८,०२६ मतं – २०.२५%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,१७,९६४
पुरुष : ७,४४,९३२
महिला : ६,७३,०३२
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 १९८९ पासून सातत्याने या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.
 मोरेश्वर सावे, प्रदीप जयस्वाल यांच्यानंतर १९९९ पासून चंद्रकांत खैरे सतत निवडून येत आहेत
 हा मतदारसंघ प्रामुख्याने शहरी असून, महापालिकेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे.
 शहराच्या दुरवस्थेस शिवसेनेला दोष दिला जातो
 तरी कोणत्याही निवडणुकीपूर्वी धार्मिक कट्टरता या मुद्दय़ावर शिवसेनेचा फायदाच होतो, असा अनुभव आहे.
 हैदराबादस्थित मजलीस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या संघटनेने मराठवाडय़ात हळूहळू विस्तारण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत या संघटनेने चुणूक दाखविली.
 दुसरीकडे काँग्रेसमध्ये आनंदी आनंदच आहे. गेल्या वेळी शांतीगिरी महाराजांना सुमारे दीड लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तिरंगी लढतीत खैरे हे निवडून आले होते. एकूणच बालेकिल्ल्यात शिवसेनेसाठी लढत यंदा चुरशीची होणार आहे.
 आशिया खंडातील वेगाने वाढणारे शहर म्हणून नावलौकीक मिळवला आहे, मात्र सध्या वाढ खुंटली आहे त्याला पुन्हा वेग देणं महत्त्वाचं काम आहे...
 मतदार संघातील पाण्याचा प्रश्न मोठा आहे तो सोडवणे मोठे आव्हान आहे.
 मतदार संघात अजिंठा वेरूळ यासारखे मोठे पर्यटन स्थळ आहेत.. त्यांच्या विकासाकडे लक्ष देण गरजेच आहे.
 दोन पंचतारांकीत औद्योगिक वसाहती आहेत.. त्याचबरोबर येत्या काही वर्षाच डिएमआयसीद्वारे मोठी गुंतवणूक होणार आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
 मुस्लिम आणि हिंदूचं दंगली होण्याबाबत शहराचा वाईट इतिहास आहे, त्यामुळे जातीय सलोखा राखण हे एक फार मोठं आव्हान आहे.
 ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात मतदार संघात आहे त्यांच्या विकासाचा प्रश्न फार मोठा आहे... मतदार नाराज आहेत त्यामुळे त्यांची समजूत घालून निवडणूका लढणं मोठं आव्हान असणार आहे.
 महापालिका कंगाल आहे शहर बकाल होत चाललं आहे त्यामुळे शहराकडे वेळीच आता लक्ष न दिल्यास याचा फटका निवडणुकीत बसू शकतो..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.