बॉलिवूड आणि सेलिब्रेटींमध्येही मोदी फिवर!

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, March 25, 2014 - 11:51

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातमध्ये निवडणूक प्रचार चांगलाच रंगणार असल्याचं दिसतंय. कारण बॉलिवूड तारेतारका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी प्रचार करण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास वीस तारेतारकांनी नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.
फिल्म शूटिंग, मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय या ना त्या कारणानं तारेतारका मोदींची भेट घेतात. सर्वांनाच नरेंद्र मोदींच्या गूड बुक्समध्ये रहायचंय. यातल्या बहुतांश प्रत्येकानंच पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावावर पसंती दर्शवली होती.
मोदींना चित्रपट किती आवडतात, किती रस आहे हे मोदीच जाणोत. मात्र बॉलिवूडमधल्या अनेकांना मोदींच्या गूड बुक्समध्ये राहण्याची गरज वाटू लागली यातच सारं काही आलं. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांपासून दबंगमॅन सलमान खानपर्यंत अनेकांनी मोदींची भेट घेतलीय.
कोण कोणते सेलिब्रेटी भेटले मोदींना आणि कोणी दिली पाठिंबा
बीग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, प्रिती झिंटा, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, जॉन अब्राहम, लता मंगेशकर, मल्लिका शेरावत, राखी सावंत, जुही चावला, रविना टंडन, अक्षय कुमार, मोना थिबा आणि विशेष म्हणजे मॉडेल मेघना पटेल हिनं तर मोदींच्या फोटोसह खास हॉट फोटोशूटही केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Tuesday, March 25, 2014 - 11:51


comments powered by Disqus