मोदींविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली, जामीन नाकारला

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्याने, गोव्यातील देऊ चोडणकर याचा जामीन गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. 

Updated: May 23, 2014, 11:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्याने, गोव्यातील देऊ चोडणकर याचा जामीन गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. 
देऊ चोडणकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
देशात भाजपा सरकार आले, आणि मोदी पंतप्रधान झाले तर, गुजरात सारख्या दंगली गोव्यातही होतील, अशी पोस्ट चोडणकर यांनी निवडणुकीदरम्यान केली होती. त्या विरोधात अतुल काणे यांनी गोवा सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती.
तक्रारीनंतर पोलिसांनी चो़णकर यांना समन्स दिला होता, या समन्स विरोधात अटक पूर्व जामीनासाठी चोडणकर यांनी गोवा न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो न्यायालयाने फेटाळला आहे. याविषयी काँग्रेसने गोवा पोलिसांचा निषेध करत सरकारवर तोफ डागली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.