`अवाजवी खर्च नको; भाऊ-पुतण्यांना लांबच ठेवा`

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना भाऊ-पुतण्यांपासून दूर राहण्याची तंबी दिलीय. तसंच मंत्र्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला मोदींनी देऊन टाकलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 07:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना भाऊ-पुतण्यांपासून दूर राहण्याची तंबी दिलीय. तसंच मंत्र्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला मोदींनी देऊन टाकलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशाचे नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यामध्ये सदस्यांना अवाजवी खर्चाला लगाम घालण्याचा आणि आपल्या कुटुंबातील लोकांना पीए आणि पीएस बनवू नये, असा सल्ला मोदींनी दिलाय.
सरकारी बंगले सजविण्यासाठी जास्त खर्च करू नका, असंही त्यांनी बजावलंय. तसंच पंतप्रधानांनी यावेळी पीएमओच्या अधिकाऱ्यांनाही जनता दरबार भरवण्याचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांनी एखादा दिवस आणि वेळ निर्धारित करावी आणि जनतेच्या तक्रारी नोंदवून घ्याव्यात, असे निर्देश मोदींनी यावेळी दिलेत.
पंतप्रधानपदाचा कारभार हातात घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या पहिल्याच औपचारिक बैठकीत मोदींनी हे निर्देश दिलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.