अब्दुल्लांनी काश्मीरची वाट लावली - मोदींची टीका

फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी काश्मिरची वाट लावली, अशा तिखट शब्दात नरेंद्र मोदींनी फारूख अब्दुल्ला यांच्यावर सणसणीत टीका केली. नरेंद्र मोदी यांनी फारूख अब्दुला यांच्या टीकेला हे उत्तर दिल आहे.

Updated: Apr 28, 2014, 04:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी काश्मिरची वाट लावली, अशा तिखट शब्दात नरेंद्र मोदींनी फारूख अब्दुल्ला यांच्यावर सणसणीत टीका केली. नरेंद्र मोदी यांनी फारूख अब्दुला यांच्या टीकेला हे उत्तर दिल आहे.
नरेंद्र मोदींना मत देणा-यांनी समुद्रात जीव द्यावा, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केलं होतं. या टीकेला मोदींनी ट्विटरद्वारे अब्दुल्लांवर निशाणा साधलाय.
अब्दुल्ला यांच्या कुटुंबियांनी जातीयवादी राजकारण करत धर्माच्या नावावर लाखो काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून हाकलून लावले, असे सांगत हाच त्यांचा धर्मनिरपेक्षपणा का? असा प्रश्न त्यांनी विचारला. भारताच्या संस्कृतीला तुमच्याच कुटुंबियांनी सर्वात जास्त नुकसान पोहोचवले असल्याचंही स्पष्टपणे म्हटलंय.
मोदींना मत देणा-यांना समुद्रात जीव देण्याचा सल्ला देण्याच्या वक्तव्याबद्दलही त्यांनी रोखठोक उत्तर दिले. देशाच्या रक्तातच धर्मनिरपेक्षता ठासून भरलेली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची भाषा करणा-या फारूख अब्दुल्लांनी काश्मीरमध्ये स्वतः काय केलं हे पहावं असंही मोदींनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.