मुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान

गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 24, 2014, 09:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

गेल्या निवडणुकीत मुंबईत ४३.५२ टक्के मतदान झाले होते. ते वाढून ५३ टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे. १९९१ नंतर मुंबईत प्रथमच ५० टक्क्यांचा आकडा पार केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.