नरेंद्र मोदी बडोद्यातून, अडवाणी गांधीनगरमधून

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत हिना गावित यांना नंदुरबारमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Mar 19, 2014, 08:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत हिना गावित यांना नंदुरबारमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबत कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघही आता स्पष्ट होत असतांना दिसतोय.
लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात येणार आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या बडोद्यातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपकडून दिल्लीत आठ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राजवर्धन राठोडला राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.