कमळ रुतलं बंडखोरीच्या चिखलात

Last Updated: Tuesday, January 31, 2012 - 15:49

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंही तोच कित्ता गिरवला आहे.

 

मुंबई शहर भाजप अध्यक्ष राज पुरोहितांच्या सूनेनं अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी करत पक्षाला उघड आव्हान दिलं आहे.

 

राज पुरोहित हे भाजपचे सलग चार वेळा आमदार राहिले आहेत तसंच ते मुंबई अध्यक्ष देखील आहेत. आता पुरोहित यांच्या सूनेनंच पक्षाची शिस्तच मोडीत काढली आहे. भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

First Published: Tuesday, January 31, 2012 - 15:49
comments powered by Disqus