पराभवाला मी जबाबदार नाही - मनोहर जोशी

Last Updated: Wednesday, February 22, 2012 - 14:24

www.24taas.com,  मुंबई

 

शिवसेना नेते मनोहर जोशींनी दादरमधील पराभवाची जबाबदारी झटकलीय. दादरमधील पराभावाला आपण व्यक्तीश: जबाबदार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. याबाबत ते 'झी २४ तास'शी बोलत होते.

 

पराभावाला काही कारणं असतात मात्र ती जनतेपर्यंत पोहचू शकत नाही असं सूचक विधान जोशींनी केलंय. त्यामुळं त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा आता सुरू झालीय. तर खासदारकीबाबत अजून चर्चा झाली नसून कुणाची वर्णी लागणार याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

 

पराभवाबाबत चर्चा कऱण्यासाठी मनोहर जोशींनी पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊतही उपस्थित होत्या. दादर आणि माहिममध्ये मनसेनं शिवसेनेच्या सातही उमेदवारांचा दारूण पराभव केला. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या जीव्हारी लागला आहे.

 

 

आणखी संबंधित बातमी

मनोहर जोशी सर अडचणीत?First Published: Wednesday, February 22, 2012 - 14:24
TAGS:


comments powered by Disqus