मनसे उमेदवारानं केला कार्यकर्त्याचा खून

Last Updated: Monday, February 20, 2012 - 14:32

www.24taas.com, नागपूर

 

महापालिका निवडणुक संपून काही तास उलटत नाही तोवर नागपूरात राडा सुरू झाला. नागपुरात महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजीत राडा सुरु झाला आहे. मनसेच्या एका पराभूत उमेदवारानं एका मतदार कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना रेशीमबाग परिसरात घडली आहे.

 

संजय बारई असं या उमेदवाराचं नाव आहे, पोलिसांनी संजयसह तिघांना अटक केली आहे. केशव आकरे असं खून झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती असं सांगण्यात येत आहे. केशव आकरेनं निवडणुकीत संजय बारईला मदत केली नव्हती. त्यामुळं पराभव झाल्याची भावना संजयच्या मनात होती.

 

या रागातून संजयनं केशवचा निघृण खून केला. या प्रकरणी इमामवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संजय बारईसह तिघांना अटक केली आहे. मनसे किंवा इतरही काही पक्षामध्ये गुन्हेगारांना उमेदवारी मिळते असे नेहमीच नागरिकांकडून म्हटले जाते. त्यावर पक्षप्रमुख बचाव करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता नागपूरमध्ये या खुनाने ते सिद्ध देखील केले आहे.

 

 

First Published: Monday, February 20, 2012 - 14:32
comments powered by Disqus