सुहासिनी लोखंडे आघाडीत जाणार?

Last Updated: Sunday, March 4, 2012 - 18:06

www.24taas.com, ठाणे

 

ठाण्याच्या भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे या आघाडीच्या गोटात सामिल झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. युतीचे ८० टक्के नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळं संशयाला बळ मिळालं आहे.

 

ठाण्यात सुरू असलेल्या राजकीय धुळवडीमुळं ठाणेकर वैतागले आहेत. ठाण्याचा बिहार झाला आहे का अशी भावना ते व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राजकारण्यांच्या अश्या वागण्यामुळे लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. असल्या किळसवाण्या राजकारणामुळे सामान्य नागरिकांचा नेत्यांवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे.

 

राजकारणात मश्गूल असणाऱ्या नेत्यांच्या मुजोरीमुळे ठाणेकरांच्या हालअपेष्टा कायम आहेत. सामान्य नागरिकांना अशा राजकारणामुळे मुलभूत सुविधा मिळणार तरी कधी ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

 

 

 

 

 

First Published: Sunday, March 4, 2012 - 18:06
comments powered by Disqus